कुंभकोणम हे नाव वाचले, की पुलंच्या असा मी असामी मधला प्रोफेसर कुंभकोणम आठवतो, त्या मॉडर्न गुरूदेवांची आरती एखाद्या म्हशीपासून ताटातूट झालेल्या रेड्याच्या आर्ततेने गाणारा. पण आज त्या गावाबद्दल थोडेसे. कुंभकोणम हे गाव चेन्नईपासून साधारण चारशे किलोमीटरवर आणि तिरुचिरापल्ली एअरपोर्ट पासून ९० किलोमीटरवर आहे. चेन्नईपासून रेल्वे किंवा बसने ६ तासाच्या प्रवासात आपण ह्या गावाला येतो. प्रलय…
त्र्यंबकेश्वर – ब्रह्मगिरीची फेरी कशी कराल
अनेक शिवभक्त त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीची फेरी करतात. वर्षभर हि फेरी करता येते, पण श्रावणातल्या सोमवारी – विशेषतः तिसऱ्या सोमवारी हि फेरी करण्याचे खास महत्व आहे. पण ह्या तिसऱ्या सोमवारी अमाप गर्दी लोटलेली असते, त्यामुळे बाकी सोमवार धरून गेल्यास शांतपणे फेरी होऊ शकते. मी सुद्धा हि फेरी कित्येक वेळा केलेली आहे. फेरी करताना मला जाणवायचं कि लोक…
त्र्यंबकेश्वर – ब्रह्मगिरीची फेरी – माझा अनुभव
त्र्यंबकेश्वर हे स्थान भारतातील बारा ज्योतिर्लिंगामधील एक आहे. माधवराव पेशव्यांनी १७७५ च्या सुमारास ह्या भव्य मंदिराचे पुनर्निर्माण केले. ‘ब्रह्मगिरी’ नामक विशाल डोंगराच्या कुशीत वसलेले त्र्यंबकेश्वर हे छोटेसे गाव अध्यात्माचा मोठा वारसा बाळगून आहे. कित्येक पंथांची मठ-मंदिरे, तसेच कालसर्प योग, नारायण नागबळी शांती असल्या धार्मिक कार्यांनी कायम गजबजलेले हे गाव शतकोनुशतके भाविकांना आपल्याकडे खेचून आणते आहे….
त्र्यंबकेश्वर येथील गंगाव्दार – गोदावरी नदीचे उगमस्थान
नाशिकजवळ वसलेले त्र्यंबकेश्वर देवस्थान तेथील ज्योतिर्लिंगासाठी आणि धार्मिक विधींसाठी जगप्रसिद्ध आहे. ज्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत हे गाव वसलेले आहे, त्या पर्वतावर देखील महत्वाची देवस्थाने आहेत. तेथील ‘गंगाव्दार’ या ठिकाणी जायचा योग यंदाच्या श्रावणात आला. ब्रह्मगिरी हे गोदावरी नदीचे उगमस्थान. पण येथे उगमस्थानी बालरूपातील श्री गोरक्षनाथ आले असताना त्यांनी गोदावरीस ‘गंगा’ असे संबोधले, तेंव्हापासून गोदावरी नदीच्या…
दत्तांचे गुरु – भाग ३
१७. पिंगळा नामक गणिका पिंगळा नावाची गणिका शरीर सुखाचा व्यवसाय करीत होती. तारुण्यकाळी निसर्गदत्त सौंदर्यामुळे तिने भरपूर कमाई केली. पण वृद्धापकाळामध्ये कोणी तिच्याकडे येईनासे झाले. एकेकाळी इतक्या प्रसिद्ध असलेल्या पिंगळेला ‘आज कोणी येईल का’ हा विचार अतिशय क्लेशदायक होऊ लागला. तिला जाणीव झाली की तरुणपणामध्ये जर मी शरीरसुख आणि धनाच्या मागे न लागता परमेश्वराच्या मागे…
दत्तांचे गुरु – भाग २
९. अजगर: अजगर कधी असे म्हणत नाही, कि आजचा उंदीर तिखट होता, आजचे सावज गोड होते. जे समोर येईल ते गिळतो. तसेच योग्याने जे समोर येईल, जे घडेल, त्याचा स्वीकार करावा. आजच्या भाषेत: ‘Accept’ करावे ‘react’ करू नये. १०. समुद्र जगभरातील नद्या अखेरीस समुद्रात येऊन रित्या होतात. पावसाचे पाणी, पर्वतांचा बर्फ जगप्रवास करून शेवटी समुद्रास…
दत्तांचे गुरु – भाग १
१. पृथ्वी: शेतकरी दर वर्षी जमीन नांगरतो, नद्या पात्र रुंदावत समुद्राकडे धावतात, झाडे स्वतःची मुळे जमिनीत खोल रुतवतात. सर्व जीवसृष्टी रोज पृथ्वीला पायदळी तुडवते. पण स्वतःवर अश्या यातना करणाऱ्यांना देखील पृथ्वी भरभरून देते. पृथ्वी हि आपल्याला सहनशीलता आणि परोपकार शिकवते. २. वायू: वायू सर्वत्र आहे, आणि जिथे आहे तिथले रूप घेतो. समुद्रकिनारा, देवघर, हिरवेगार शेत,…
गुरुमहिमा
शुक्रवार दिनांक २७ जुलै, २०१८ रोजी ह्या वर्षीची गुरु पौर्णिमा संपन्न होत आहे. भारतीय अध्यात्मामध्ये गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘गुरु’ चे अस्तित्व प्रत्यक्ष किंवा अगदी काल्पनिक जरी असले तरी देखील शिष्याच्या प्रगतीस कारणीभूत ठरते. महाभारतामध्ये एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरु मानले, त्यांची प्रतिमा बनवली आणि अंत:प्रेरणेने अर्जुनापेक्षाही वरचढ धनुर्विद्या शिकला. जिथे द्रोणाचार्यांनी एकलव्याला पाहिले देखील नव्हते, आणि…
तलावातील मासेमोजणी
आपल्याकडे गणित शिकवतात – निदान आमच्या वेळी शिकवायचे – ते पदार्थ न सांगता थेट पाककृती शिकवल्यासारखे. हि संज्ञा, हा प्रमेय, हा सिद्धांत.पण याचा उपयोग? ते अभ्यासक्रमात नव्हतं. पाककृती करताना काय बनवतोय हेच जर माहित नसेल, तर कांदा चिरा आणि फोडणी द्या वैगेरे क्रियांचा अर्थ लागणारच नाही. थोडं कळू लागल्यानंतर जेव्हा आजूबाजूच्या जगाकडे बघू लागलो, तेव्हा…
त्रिकोणमितीचा वापर
साईन कॉस टॅन अर्थात ट्रिग्नोमेट्री उर्फ त्रिकोणमिती! पण ह्याचं नाव ऐकताच बहुतांश जणांच्या पोटात गोळा उभा राहतो. बऱ्याच जणांना शाळेमध्ये ट्रिग्नोमेट्री शिकणे म्हणजे मानसिक अत्याचारच वाटत असतात. गणिताच्या सागरात बुडालेल्या बऱ्याचश्या परीक्षांच्या नौकांसाठी त्रिकोणमितीचा हिमनग कारणीभूत असतो. त्यामुळे त्रिकोणमितीबद्दल राग किंवा भीती असलेल्या लोकांची संख्या फार आहे. पण गणितातल्या बऱ्याच संज्ञा बाह्यदर्शनी अवघड किंवा…