नाशिकजवळ वसलेले त्र्यंबकेश्वर देवस्थान तेथील ज्योतिर्लिंगासाठी आणि धार्मिक विधींसाठी जगप्रसिद्ध आहे. ज्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत हे गाव वसलेले आहे, त्या पर्वतावर देखील महत्वाची देवस्थाने आहेत. तेथील ‘गंगाव्दार’ या ठिकाणी जायचा योग यंदाच्या श्रावणात आला. ब्रह्मगिरी हे गोदावरी नदीचे उगमस्थान. पण येथे उगमस्थानी बालरूपातील श्री गोरक्षनाथ आले असताना त्यांनी गोदावरीस ‘गंगा’ असे संबोधले, तेंव्हापासून गोदावरी नदीच्या…