कुंभकोणम – नवग्रह आणि बरेच काही

कुंभकोणम हे नाव वाचले, की पुलंच्या असा मी असामी मधला प्रोफेसर कुंभकोणम आठवतो, त्या मॉडर्न गुरूदेवांची आरती एखाद्या म्हशीपासून ताटातूट झालेल्या रेड्याच्या आर्ततेने गाणारा. पण आज त्या गावाबद्दल थोडेसे. कुंभकोणम हे गाव चेन्नईपासून साधारण चारशे किलोमीटरवर आणि तिरुचिरापल्ली एअरपोर्ट पासून ९० किलोमीटरवर आहे. चेन्नईपासून रेल्वे किंवा बसने ६ तासाच्या प्रवासात आपण ह्या गावाला येतो. प्रलय…