तलावातील मासेमोजणी

आपल्याकडे गणित शिकवतात – निदान आमच्या वेळी शिकवायचे – ते पदार्थ न सांगता थेट पाककृती शिकवल्यासारखे. हि संज्ञा, हा प्रमेय, हा सिद्धांत.पण याचा उपयोग? ते अभ्यासक्रमात नव्हतं. पाककृती करताना काय बनवतोय हेच जर माहित नसेल, तर कांदा चिरा आणि फोडणी द्या वैगेरे क्रियांचा अर्थ लागणारच नाही. थोडं कळू लागल्यानंतर जेव्हा आजूबाजूच्या जगाकडे बघू लागलो, तेव्हा…

त्रिकोणमितीचा वापर

  साईन कॉस टॅन अर्थात ट्रिग्नोमेट्री उर्फ त्रिकोणमिती! पण ह्याचं नाव ऐकताच बहुतांश जणांच्या पोटात गोळा उभा राहतो. बऱ्याच जणांना शाळेमध्ये ट्रिग्नोमेट्री शिकणे म्हणजे मानसिक अत्याचारच वाटत असतात. गणिताच्या सागरात बुडालेल्या बऱ्याचश्या परीक्षांच्या नौकांसाठी त्रिकोणमितीचा हिमनग कारणीभूत असतो. त्यामुळे त्रिकोणमितीबद्दल राग किंवा भीती असलेल्या लोकांची संख्या फार आहे. पण गणितातल्या बऱ्याच संज्ञा बाह्यदर्शनी अवघड किंवा…

पत्त्यांमधले गणित – भाग २

एक गणिती चमत्कार समजा तुम्ही पत्त्यांचा जोड पिसला, तर पत्त्यांचा जो काही क्रम लागेल, तो आतापर्यंत कधीच न झालेला, आणि भविष्यात कधीच न होऊ शकणारा असेल! खरं वाटत नाही ना? इतकी वर्षे संपूर्ण जग पत्ते खेळतंय, पुढली कितीतरी शतकं पत्ते खेळले जातील. असे असताना तुम्ही जो काही पत्त्यांचा क्रम लावाल, तो एकमेवाद्वितीय, न भूतो न…

पत्त्यांमधले गणित – भाग १

उन्हाळी सुट्टी आली कि पत्ते कपाटातून बाहेर पडत. दुपारी उन्हामुळे अगदी अंधारी येऊ लागली कि गपचूप चार भिंतीत पोरं कैद असायची. शहरामध्ये झाडाची सावली, थंडगार माळरान असला काही प्रकार नसल्यामुळे बैठे खेळ हीच काय ती दुपारची कामे. त्यात ते पत्ते रोज हाताळून त्यांच्या एकेक पानाशी इतकी ओळख व्हायची कि समोरच्याच्या हातातले पत्ते पाठमोरे पाहून कोणाचा…