शब्दचित्र – मालवण

केव्हाची मैफिल रंगवलीये या वाऱ्याने . शांततेचा विचारही मनात येऊ शकत नाही, इतका कान आणि मन व्यापून टाकणारा घोंगावणारा वारा, आणि त्यात समुद्राने लावलेला खर्जातला सूर. अवघा परिसर अगदी या दैवी गुंजेने अगदी व्यापून टाकलाय. वास्तविक गोंगाट म्हटलं कि मन बिथरतं  , पण ह्या अनाहत नादाच्या तालासुरात ते देखील टोकदार होऊ पाहतंय, उसळी मारू पाहतंय….