गुंतवणूक: काय आणि कुठे?

गेल्या पोस्ट मध्ये आपण पहिले कि गुंतवणूकीला जास्तीत जास्त कालावधी देणं हे आपल्याच हिताचं असतं. पण जर का एखादी व्यक्ती पैसे जमवून उशी मध्ये साठवत असेल, तर ती ‘बचत’ झाली, गुंतवणूक नाही. गुंतवणूक म्हणजे जी तुमच्या मुद्दलावर तुम्ही गुंतवणूकीसाठी घेतलेल्या धोक्यासाठी योग्य तितका परतावा देईल. हि संकल्पना आपण ऑस्ट्रियन अर्थशास्त्राच्या भाषेत समजून घेऊयात. समजा तुमच्याकडे…

गुंतवणूकीचे योग्य वय

गुंतवणूक कधी सुरु करावी? आपल्याकडे नोकरी लागली, तर पहिले काही पगार मित्रांना पार्टी, नवीन मोबाईल, गर्लफ्रेंड(स) वैगेरे सन्मार्गी लागतात. नंतर एखाद्या कार किंवा बाईक चा हफ्ता चालू होतो. लग्न – मुलं झाल्यावर तर पगाराला इतके फाटे फुटतात कि कसलं सेव्हिंग नि कसलं काय? पण हळू हळू खर्चापेक्षा कमाई पुढे जाते, आणि मग मनुष्य गुंतवणुकीचा विचार…

स्टारफिशची कथा

एक दिवस एक माणूस समुद्रावर फिरत होता. त्याला एक मुलगा दिसला, जो किनाऱ्यावरून काहीतरी उचलून समुद्रात टाकत होता. त्या माणसाने जवळ जाऊन विचारले: “काय चाललंय रे?” त्या मुलाने उत्तर दिलं: “हे स्टारफिश भरतीमध्ये किनाऱ्यावर वाहून आलेयत, आणि आता ओहोटी लागलीये. मी एक एक करून यांना परत समुद्रात टाकतोय.” अख्खा किनारा स्टार फिशने भरला होता. त्या…

प्रश्नामधील उत्तर

बुद्धांकडे कोणी काही प्रश्न विचारायला आला, तर बुद्ध त्याला सांगायचे ‘थांब, इथे दोन वर्ष रहा. माझ्या समीप दोन वर्षे शांततेत घालाव. मग हवं ते विचार’. एकदा एक मौलुंगपुट्ट म्हणून महान विचारवंत बुद्धांकडे आले. त्यांनी प्रश्नांची मोठ्ठीच जंत्री आणली होती. बुद्धांनी त्यांचे प्रश्न ऐकून घेतले, आणि त्यांना विचारलं “मौलुंगपुट्ट, तुम्हाला खरंच उत्तर हवं आहे? तुम्ही त्याची…

मराठी टायपिंग vs Marathi typing

एके काळी मराठी टायपिंग म्हणजे करियर चॉईस असायचा. नेहमीचा कीबोर्ड सोडून मराठी कीबोर्ड शिकणं, हे एखादी नवीन भाषा शिकण्याइतकंच दिव्य होतं . पण हळू हळू टाईप ऍज यू स्पेल कीबोर्ड येऊ लागले, आणि मराठी टायपिंग सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. तुम्हाला जर तुमचे विचार स्पेलिंगनुसार टाईप करता आले तर तुमच्या मातृभाषेत ते प्रकट होऊ शकतात, अगदी सहजतेने….

पत्त्यांमधले गणित – भाग २

एक गणिती चमत्कार समजा तुम्ही पत्त्यांचा जोड पिसला, तर पत्त्यांचा जो काही क्रम लागेल, तो आतापर्यंत कधीच न झालेला, आणि भविष्यात कधीच न होऊ शकणारा असेल! खरं वाटत नाही ना? इतकी वर्षे संपूर्ण जग पत्ते खेळतंय, पुढली कितीतरी शतकं पत्ते खेळले जातील. असे असताना तुम्ही जो काही पत्त्यांचा क्रम लावाल, तो एकमेवाद्वितीय, न भूतो न…

पत्त्यांमधले गणित – भाग १

उन्हाळी सुट्टी आली कि पत्ते कपाटातून बाहेर पडत. दुपारी उन्हामुळे अगदी अंधारी येऊ लागली कि गपचूप चार भिंतीत पोरं कैद असायची. शहरामध्ये झाडाची सावली, थंडगार माळरान असला काही प्रकार नसल्यामुळे बैठे खेळ हीच काय ती दुपारची कामे. त्यात ते पत्ते रोज हाताळून त्यांच्या एकेक पानाशी इतकी ओळख व्हायची कि समोरच्याच्या हातातले पत्ते पाठमोरे पाहून कोणाचा…

शब्दचित्र – मालवण

केव्हाची मैफिल रंगवलीये या वाऱ्याने . शांततेचा विचारही मनात येऊ शकत नाही, इतका कान आणि मन व्यापून टाकणारा घोंगावणारा वारा, आणि त्यात समुद्राने लावलेला खर्जातला सूर. अवघा परिसर अगदी या दैवी गुंजेने अगदी व्यापून टाकलाय. वास्तविक गोंगाट म्हटलं कि मन बिथरतं  , पण ह्या अनाहत नादाच्या तालासुरात ते देखील टोकदार होऊ पाहतंय, उसळी मारू पाहतंय….

शब्दचित्रे

मोबाईल फोनची क्रांती झाली, आणि कॅमेरा हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला. जुन्या काळी आजोबा पणजोबांचे आयुष्यभरात अतिशय मोजकेच फोटो असायचे, ते देखील बहुधा भिंतीवर लावण्याच्या सोयीसाठीच. आधी फोटो काढणं खर्चिक आणि वेळ खाऊ होतं. रोल विकत आणा,कॅमेरा नीट वापरा, रोल डेव्हलप करा, प्रिंटचे पैसे मोजा आणि मग कळायचं कि अरेच्चा, आपण तर डोळे मिटले…

क्रिस्पी कॉर्न

बाजारात कणसाच्या दाण्यांचं १०० ग्राम चं पाकीट २० रुपयांना विकत मिळतं. नुडल्स किंवा तत्सम  रेडी टू इट पदार्थांपेक्षा हे कणसाचे दाणे किती तरी पौष्टिक आहेत. उकळत्या पाण्यात थोडं मीठ आणि कणसाचे दाणे टाकून साधारण १० मिनिटे सुगंध सुटेपर्यंत शिजवले कि झालं. वास्तविक ताजे उकडलेले गरमागरम दाणे जास्त वेळ पोटाबाहेर राहू शकत नाहीत. पण जर भूकेवर…