बुद्धांकडे कोणी काही प्रश्न विचारायला आला, तर बुद्ध त्याला सांगायचे ‘थांब, इथे दोन वर्ष रहा. माझ्या समीप दोन वर्षे शांततेत घालाव. मग हवं ते विचार’. एकदा एक मौलुंगपुट्ट म्हणून महान विचारवंत बुद्धांकडे आले. त्यांनी प्रश्नांची मोठ्ठीच जंत्री आणली होती. बुद्धांनी त्यांचे प्रश्न ऐकून घेतले, आणि त्यांना विचारलं “मौलुंगपुट्ट, तुम्हाला खरंच उत्तर हवं आहे? तुम्ही त्याची…
Tag: असंच काही
मराठी टायपिंग vs Marathi typing
एके काळी मराठी टायपिंग म्हणजे करियर चॉईस असायचा. नेहमीचा कीबोर्ड सोडून मराठी कीबोर्ड शिकणं, हे एखादी नवीन भाषा शिकण्याइतकंच दिव्य होतं . पण हळू हळू टाईप ऍज यू स्पेल कीबोर्ड येऊ लागले, आणि मराठी टायपिंग सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. तुम्हाला जर तुमचे विचार स्पेलिंगनुसार टाईप करता आले तर तुमच्या मातृभाषेत ते प्रकट होऊ शकतात, अगदी सहजतेने….
पत्त्यांमधले गणित – भाग २
एक गणिती चमत्कार समजा तुम्ही पत्त्यांचा जोड पिसला, तर पत्त्यांचा जो काही क्रम लागेल, तो आतापर्यंत कधीच न झालेला, आणि भविष्यात कधीच न होऊ शकणारा असेल! खरं वाटत नाही ना? इतकी वर्षे संपूर्ण जग पत्ते खेळतंय, पुढली कितीतरी शतकं पत्ते खेळले जातील. असे असताना तुम्ही जो काही पत्त्यांचा क्रम लावाल, तो एकमेवाद्वितीय, न भूतो न…
पत्त्यांमधले गणित – भाग १
उन्हाळी सुट्टी आली कि पत्ते कपाटातून बाहेर पडत. दुपारी उन्हामुळे अगदी अंधारी येऊ लागली कि गपचूप चार भिंतीत पोरं कैद असायची. शहरामध्ये झाडाची सावली, थंडगार माळरान असला काही प्रकार नसल्यामुळे बैठे खेळ हीच काय ती दुपारची कामे. त्यात ते पत्ते रोज हाताळून त्यांच्या एकेक पानाशी इतकी ओळख व्हायची कि समोरच्याच्या हातातले पत्ते पाठमोरे पाहून कोणाचा…
पहिली पोस्ट
लहानपणी एक छान कडवं वाचलं होतं: गाता गळा, शिंपता मळा | लिहिता लेखनकळा || गायक जितका रियाज करेल तितका तयार होईल, मळा जितका शिंपला जाईल तितका फुलेल. आणि लेखन जितकं कराल तितकं बहरेल. पण मराठी लेखन हळू हळू कमी होत गेलं. आज विचार जरी मराठीत केला तरी व्यक्त व्हायची भाषा मात्र इंग्रजीच असते. तेंव्हा खूप…