गेल्या पोस्ट मध्ये आपण पहिले कि गुंतवणूकीला जास्तीत जास्त कालावधी देणं हे आपल्याच हिताचं असतं. पण जर का एखादी व्यक्ती पैसे जमवून उशी मध्ये साठवत असेल, तर ती ‘बचत’ झाली, गुंतवणूक नाही. गुंतवणूक म्हणजे जी तुमच्या मुद्दलावर तुम्ही गुंतवणूकीसाठी घेतलेल्या धोक्यासाठी योग्य तितका परतावा देईल.
हि संकल्पना आपण ऑस्ट्रियन अर्थशास्त्राच्या भाषेत समजून घेऊयात. समजा तुमच्याकडे आज दोन अंडी आहेत. तुम्ही आजच दोन्ही खाऊन टाकू शकता किंवा विकू शकता. किंवा, त्यातले एक खाऊन दुसरे भविष्यासाठी ठेऊ शकता. भविष्यात त्या अंड्यातून कोंबडी बाहेर पडेल, आणि आणखी अंडी देईल. (कृपया जीवशास्त्राचा कीस पाडू नये!)
म्हणजेच आजचा आनंद तुम्ही पुढे ढकलता, ह्या आशेवर कि भविष्यात आणखी जास्त आनंद उपभोगू शकू. ह्याच घटनेला म्हणतात गुंतवणूक! त्यामुळे उज्ज्वल भविष्य हवे असेल, तर आजचे आनंद थोडे कमी करावेच लागतील, आणि योग्य तितकी जोखीम देखील झेलायची तयारी ठेवावी लागेल.
गुंतवणूकीचा परतावा हा तुम्ही तुमच्या गुंतवणूकीवर किती जोखीम पत्करण्यास तयार आहात ह्यावर ठरतो. ह्या विषयावर खालील मराठी पॉडकास्ट मध्ये सविस्तर माहिती ऐकण्यास मिळेल. साभार: multi-act.com.
फक्त एक सुधारणा: आहे. २०१८ पासून शेयर मार्केट च्या गुंतवणूकीवर सुद्धा १०% दीर्घकालीन कर (long term capital gain)लागू झालेला आहे.
गुंतवणुकीचे प्रकार समजून घेण्यासाठी नक्की ऐका: