लहानपणी एक छान कडवं वाचलं होतं:
गाता गळा, शिंपता मळा |
लिहिता लेखनकळा ||
गायक जितका रियाज करेल तितका तयार होईल, मळा जितका शिंपला जाईल तितका फुलेल. आणि लेखन जितकं कराल तितकं बहरेल. पण मराठी लेखन हळू हळू कमी होत गेलं. आज विचार जरी मराठीत केला तरी व्यक्त व्हायची भाषा मात्र इंग्रजीच असते.
तेंव्हा खूप दिवस मनात होतं कि काहीतरी लिहिलं पाहिजे. पण काय लिहायचं? मग आठवलं , कि रामदास स्वामींनीच म्हटलं आहे,
दिसामाजी काहीतरी ते लिहावे |
प्रसंगी अखंडित वाचीत जावे ||
म्हणून आजच्या या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, मंगल सुरुवात करीत आहे. रोज काहीतरी लिहीन या आशेने हि साईट : काहीतरी डॉट कॉम .
आशा आहे कि वाग्वादिनी देवी सरस्वती रोज काही सुचवेल.